आमच्या बद्दल

नमस्कार मी सौ. आरुणा विजय चौधरी. मी माझ्या "चौधरी बिर्याणी हाऊस" तर्फे आपणा सर्वांचे मनपुर्वक आभार मानते व तसेच आमच्या ग्रहाकांने चौधरी बिर्याणी हाऊसच्या सर्व खाद्य मेनूवर विश्वास ठेऊन आम्हाला जो भरभरुन प्रतिसाद दिला आणि आजसुध्दा त्याच विश्वासाने प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल खरच मी व माझा संपुर्ण परिवार तुमच्या सर्वांचे शेवठ पर्यंत ऋणि राहीन यात शंका नाही.

माझ्याबद्दल व माझ्या परिवाराबद्दल बोलायचे म्हणलेतर भरपुर काही प्रसंग आहेत. मी हा माझा व्यावसाय कसा चालु केला? त्यात किती आडचणींचा सामना करावा लागला वगैरे वगैरे?? पण आसो मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगुन तुमचा किमती वेळ कमी घेते.

माझे पती शिप्ट प्रमाणे रिक्षा चालवण्याचे काम करत होते आणि मी काही सोसायटी मध्ये धुणी भांडीचे मोलकरिण म्हणुन काम करत होते. मला दोन मुल आणि एक मुलगी आसा माझा परिवार आहे. माझी दोन्ही मुल जे काम मिळेन ते काम करत करत आम्ही आमचा संसार कसाबसा चालवत होतो. आमच्याकडे स्वता:ची कोणतीच व कसल्याही प्रकारची प्राॅपर्टी नाही. जेंव्हा 2021-22 दरम्यान लाॅक डाऊन पडला तेंव्हा मात्र आमचे खाण्यापिण्याचे फार मोठे हाल झाले. आम्ही पुर्ण हावालदिल झालो होतो. कोणी मदत करण्यास तयार नव्हते. परंतु आम्ही ते हाल पुर्ण सोसत सोसत तो कठिण प्रसंग भागवला. नंतर माझ्या पतीने विचार केला की मुलांचे शिक्षण कमी आहे त्यामुळे भविष्यात ह्यांना कुठेही चांगली नोकरी मिळने फार कठीण होणार. मिळालीतर ती कमी पैशात जास्त काम करुन घेणारी नोकरी मिळणार. रिक्षा चालवुन घरच नीट भागवता येत नाही तर मी काय मुलांचे भविष्य बदलणार आणि घडवणार हा संपुर्ण विचार केल्यानंतर आपणच आपला स्वता:चा हाॅटेल व्यावसाय का सुरु करु नये आसा विचार करुन त्याबद्दलचा ठाम निर्णय माझ्या पतीने घेतला. कारण आमच्याकडे हाॅटेलसाठी लागणारी भांडी तर होतीच परंतु ती भांडी घेण्यासाठी मला ज्या सरकारी बँकेने कर्ज दिले त्याला कर्जासाठी मला संपुर्ण दोन वर्ष चकरा मारण्यास मला भाग पाडले भरपुर मानसीक व आर्थिक त्रास देऊन मला हे लहान व्यावसायीक कर्ज दिले होते. त्याच कर्जाच्या पैशातुन मी थोडीफार हाॅटेल व्यावसायाला लागणारी भांडी मी घेतली होती.

माझ्या पतीने माझ्याशी चर्चा करुन मला सांगितले की तुला जेवण छान बनवता येते तुझ्यात जेवण बनवण्याची कला छान आहे आणि तु कष्ट फार करतेस. तु जे पुर्ण दिवसभर सोसायटीमध्ये घरो घरी जाऊन जेवण बनवते तेच कष्ट आपण दोघांनी मिळुन आपल्याच हाॅटेलमध्ये केलेतर आपण स्वता:चे चांगले हाॅटेल चालवु शकतो आशाप्रकारची पुर्ण चर्चा आमच्यात सुरु झाली परंतु मी स्वता:चा हाॅटेल व्यावसाय चालु करण्यास नकार दिला होता कारण मला माहिती होते ह्या व्यावसायासाठी भरपुर पैसाची गरज भासणार ते जमवायचे कोठुन आणि देणार तरी कोण? परंतु माझ्या पतीने ह्या संपुर्ण गोष्टीवर विचार केल्यानंतर आम्ही दोघांनी स्वता:चे बिर्याणी हाऊस टाकण्याचा ठाम विचार केला. कारण माझ्या पतीना पुर्ण विश्वास होता. माझ्या पतींना पुर्ण अंदाज होता की जर लाॅक डाऊन उघडलेतर फक्त एकच व्यावसाय जोरात चालेन तो म्हणजे ( नॅनवेज ) बिर्याणी हाऊस जास्त चालेन ह्याचा त्यांना आधीच अंदाज होता. माझ्या पतीने बिर्याणी हाऊस सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु आमच्या घरात कोणालाच बिर्याणी किंवा दालचा राईस हे मेनू बनवता येत नव्हते. त्यासाठी कोणते मसाले लागतात. तर कशा पध्दतीने बनवले जाते ह्याबद्दल आम्हाला कोणालाच कसलीच कल्पना नव्हती. आमच्या घरात आम्हाला साधी भाजी लवकर मिळत नव्हती तर चिकन मटण कधी मिळणार आशी कठीण परस्थिती आसल्यामुळे आमच्या घरात कधीच नाॅनवेज बनत नव्हते. त्यामुळे मला सुध्दा चिकन मटण कसे बनवायचे याचा फार कमी आनुभव होता.

परंतु मला माझ्या पतीचा स्वभाव पुर्णपणे माहित होता. त्यांनी कधी कोणता निर्णय घेतला की ते काम पुर्ण होईपर्यंत त्याचा पिछा सोडणारच नाही हयाची मला पुर्ण माहिती होती. त्यानुसार माझे पती पुर्ण पुर्ण रात्र नुसते यु ट्युबवर व्यावसायाबद्दल व बिर्याणी आणि दालचा राईस बद्दल व्हिडिओ बघत राहायचे आणि त्यांच्या वहीवर काही टिप्स ते लिहुन ठेवायचे. नंतर त्याचा ते पहिले पुर्ण आभ्यास करायचे नंतर त्याच पध्दतीने आम्हा सर्व परिवाराला प्रशिक्षण देत राहायचे. व्यावसाय कसा करावा. मसाले कसे बनवायचे. जेवण बनवण्यासाठी भांडी कोणती कशी आसावीत. जेवण बनवताना कोणत्या वेळेला किती गॅस वाढवायचा कधी गॅस कमी करायचा आशा आनेक गोष्टी आम्हाला शिकवत होते. आम्ही रोज बिर्याणी आणि दालचा व त्याचे पावडर मसाले आसे बनवुन ते लोकांना वाटायचो. आम्हाला हे सर्व शिकता शिकता 4 ते 5 महिने लागले. त्यासाठी जे राशन व मसाले लागत होते त्या पैशासाठी मी जिथे काम करत होते त्या प्रत्येक घर मालकाने मला थोडी थोडी फायनान्शियल मदत केली होती. त्यांचे आज ही माझ्यावर मोठे उपकार आहेत.

माझे पतीने आमच्या मुंढवा केशवनगर एरिया पासुन 10 कि.मी अंतरावर जेवढे चांगल्यात चांगली बिर्याणीचे रेस्टाॅरेंट व लहान मोठे हाॅटेल्स होते त्या सर्वांची ते रोज दोन बिर्याणी घरी आणुन टेस्ट करत होते. आशा प्रकारे त्यांनी 165 जाग्याची बिर्याणी घरी आणुन त्यांनी टेस्ट केल्या. नुसत्या टेस्टच नाही तर त्या प्रत्येक बिर्याणी बद्दल ते वही मध्ये लिहुन ठेवत आसत आणि त्यामध्ये आपल्याला आजुन काय बदल करुन ह्याोेक्षा कमीत कमी दरामध्ये प्रोफेशनल चिकन बिर्याणी आणि दालचा राईस देता येईन का त्याबद्दल ते दिवस रात्र त्यावर आभ्यास करत बसायचे. आसे करत करत आम्ही बिर्याणी व दालचा हे सर्व प्रोफेशनल रेसिपी तर शिकलो होतो. परंतु आम्हाला आमच्या स्वता:चे बिर्याणी हाऊस टाकण्यासाठी एखारद्या चांगल्या एरिया मध्ये गाळा घेणे गरजेचे होते. कारण आमची खरी हैद्राबादी चिकन दम बिर्याणीची टेस्ट ही फक्त आम्हाला माहिती होती ती टेस्ट लोकांपर्यंत जाणे फार गरजेचे होते. परंतु त्या दुकानासाठी लागणारे डिपाॅझीट व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी आमच्याकडे 1 रुपया सुध्दा नव्हता. शेवठी आम्हाला एका सावकाराने आम्हाला एक वर्षाच्या मुदतीसाठी काही व्याजाने पैशांची मदत केली आणि आम्हाला गाळा घेऊन दिला. परंतु जेंव्हा 2 महिन्यातच आमच्याकडील बिर्याणी व दालचाची टेस्ट व आमची स्वच्छता ग्रहाकांना फार आवडु लागल्याने आमच्या व्यावसायात वाढ होऊ लागली. आम्ही त्या सावकारालाला वेळेवर भाडे व व्याज देत आसताना देखील आम्हाला दुकानाचे भाडे व व्याज वाढवुन द्या नाहीतर दकान खाली करा आसा आमच्यावर दबाव आणण्यास सुरु केले. माझे पैसे आताच्या आता द्या किंवा तुमचा व्यावसाय जसा तुमच्या नावावर चालु आहे तसाच चालु राहु द्या तुम्ही दोघे नवरा बायको व तुमचे दोन मुल येथे कामाला म्हणुन रहा त्याबदले मी तुम्हाला घरातील किरकोळ राशन व तुम्ही राहता त्या फ्लॅटचे भाडे देतो. माझे सर्व पैसे फिटे पर्यंत मी रोजचा संपुर्ण धंदा घेणार आशा विचित्र आटी आम्हाला लादुन काही राजकरणी व पोलिस खात्यातील काही आधिकारी यांच्याशी संगमत करुन आमच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. आम्ही ते मान्य न केल्यामुळे मला तीनच महिन्यात आमची सर्व भांडी जप्त करुन आम्हाला गाळा खाली करण्यास सांगितले व आमची मोठी फसवणुक करुन काही कारण नसताना फक्त घाणेरड्या प्रकारची विचारश्रेणी ठेऊन आमची सर्व बाजुने कोंडी करुन आमची सर्वात मोठी फसवणुक केली गेली. परंतु आम्ही त्या दबावाला बळी न पडता त्या प्रसंगलासुध्दा त्याच ताकदीने उत्तर दिले ( सध्या त्या सर्व विषयाराबद्दल कोर्टात केस चालु आहे त्या केससाठी आम्ही कोणताही वकील न देता स्वता: आमची केस आम्ही लढत आहोत आणि लवकरच त्या केसवर विजय मिळवुन आसल्या भ्रष्ट व खराब नियतीच्या लोकांना धडा शिकवणार हे नक्कीच )

माझ्याकडे जी भांडी होती ती सुध्दा जप्त केल्यामुळे मला पुढे कुठेतरी छोटासा परत व्यावसाय सुरु करावा म्हणलेतरी माझा तो सुध्दा मार्ग मद्दाम आणि कपटीपणाने बंद करुन टाकला होता. नंतर माझा पुर्ण एक वर्ष बंद ठेवला कारण माझी कोणतीच फायनान्शियल परिस्थिती नव्हती. आम्हाला स्वता:ची कोणतीच प्राॅपर्टी नसल्यामुळे व आमच्याकडे कोणतीच किमती वस्तु गहाण ठेवण्यास वस्तु नसल्यामुळे आम्हाला कोणीच पैसे देण्यास तयार नव्हते होत. नंतर सहा ते सात महिन्याने माझ्या पतीने फार हिमतीने व प्रयत्न करुन करुन त्यांनी परत दुसरीकडुन व्याजाने पैसे घेतले आणि एक मोकळी जागा शोधुन त्या मोकळ्या जाग्यात शेड टाकुन चांगले हाॅटेल बांधले परंतु ज्या दिवशी आमच्या बिर्याणी हाऊसचे ओपनींग करायचे होते त्याच्या एक दिवस आधीच जागा मालकाच्या परिवारातील आप-आपसातील वादामुळे माझे बांधलेल्या बिर्याणी हाऊसचे शेड पाडुन टाकले. त्यावेळेस मात्र मी व माझा परिवार पुर्णपणे खचुन गेला होता. माझी मानसीक परिस्थिती फारच ठासळुन गेली होती. पोटाला अन्न नाही वरुन लोकांचे कर्ज हया विचाराने माझी पुर्ण झोप उढली होती. परंतु माझे पती फार जिद्दी होते त्यांनी त्यांचे प्रयत्न चालुच ठेवले होते माझे पती कधीच रडत नाही किंवा जास्त टेन्शन घेत नाहीत हे मला माहिती होते. माझे पती जेंव्हा बेडरुम मध्ये एका जागेवर दोन दोन तीन तीन दिवस मोबाईलवर बसुन राहातात त्यावेलवेळेस मला पुर्ण अंदाज येतो की नक्की पुढे काहीतरी मोठा प्लान होणार हे नक्की कारण माझ्या पतीच्यस स्वभावात हार मानने आणि कोणापुढे नमने हे त्यांना मान्यच नाही.

नतर मी सगळ्या प्रकरणाला कंटाळुन मी पहिले जे धुणेभांडीचे काम करत होते त्या माझ्या कामाला जाण्यास सुरुवात केली. त्या पडत्या काळात आम्ही फार मोठा त्रास सहन केला. एकीकडे सावकार लोक घरी येऊन शिव्या शाप देत त्रास देयचे. जिवे मारण्याच्या धमक्या. घरातील वस्तु घेऊन गेले. कधी कधी फ्लॅट मालकाने सुध्दा भाडे न दिल्यामुळे फ्लॅटला कूलुप लावुन आम्हाला दिवस दिवस बाहेर ठेवले. कोणी माझ्या पतीची चेष्टा करुन बोलायचे कुठेतरी काम कर व्यावसाय करण्याची तुझी लायकी नाही. तु सुध्दा भीख मागशील आणि बायका पोरांना सुध्दा सिंग्नलवर भिख मागायला उभा करशील आसे चार चौघात बोलुन हिनवत आसत. चारचौघात माझ्या पतीवर हासुन हे बघा चौधरी बिर्याणीचे मालक आले घरात खायला आन्न नाही आणि फक्त बोलबच्चन करुन तोंडातुन फुसकी हवा काढतो आसे बोलुन चेष्टा केली जायची. परंतु मला माझ्या पतीविषयी मला माहिती होते की माझे पती काय चीज आहे ते. कधी कधी तर मुलाचे मित्र मंडळीसुद्धा मुलांची टिंगल करत आसत आसा फार त्रास सहन केला आम्ही. आणि ही संपुर्ण सत्य गोष्ट आहे. माझे पती व्यावसाय परत चालु करण्यासाठी सर्वांना येड्यासारखे पैसे मागत फिरत होते पर्ंतु कोणीही मदत केली नही. नंतर मी ह्या संपुर्ण प्रकरणाला वैतागुन कामाला जाण्यास सुरुवात केल्यानंतर माझा पगार झाला त्या पैशात मला सावकाराचे व्याज घरभाडे आसे बाहेरचे भरपुर देणे होते परंतु मी लोकांचे पैसे थांबवुन त्यांचा भरपुर त्रास सहन केलापण मी पहिले त्याच पैशातुन माझे बिर्याणी हाऊस एका हात गाडीवर सुरु केले. आणि तेथुनच हाळु हाळु खरी माझी वाटचाल सुरू झाली. आज आम्ही यशाच्या वाटेवर आहोत. आज परस्थिती वेगळी आहे. लवकरच "चोधरी बिर्याणी हाऊस" या नावाने पुर्ण महाराष्ट्रात शाखा सुरु होतील त्यावर जलद गतीने आमची सर्व आनुभवी तज्ञ लोकांची टीम दिवस-रात्र काम करत आहे.

माझा आनुभव मला हे सांगतो की जेंव्हा आपल्यावर मोठी संकटे येतात तेंव्हा त्या संकटाला कधीच घाबरायचे नाही. जेंव्हा संकटे येतात तेंव्हा लक्षात ठेवायचे की पुढचा प्रवास हा यश दायक आणि सुखकारक रहणार हा प्रकृतीचा नियम आहे. परंतु त्यासाठी जिद्द / कष्ट / ईमामदारी आणि संयम याचे कडक पथ्ये पाळायचेच नक्की तुम्हाला यश येणार. पुढे कोणीही आसो शांत डोक्याने लढायचे मागे सरकने किंवा खचुन जाणे हा विचार सुध्दा डोक्यात कधी आणायचा नाही. नक्कीच तुम्हाला यश येईन हे मी माझ्या आनुभवाचे बोल तुम्हाला सांगुन येथेच थांबण्याची परवानगी घेते. आणि हो तुम्ही तुमचा किमती वेळ माझ्यासाठी खर्च केला त्यावद्दल मी संपुर्ण चौधरी परिवारातर्फे परत एकदा मनापासुन आभार व्यक्त करते.

                                                                                              चौधरी बिर्याणी हाऊस

आमचा उद्देश आणि आमचे ध्येय

  आपल्या पुणे शहरात 60 टक्के लोक बाहेरच्या राज्यातुन व शहरातुन येथे आपली उदरउपजिविका भागवण्यास आलेले आहेत. कोणी कुंटुबा सोबत रहतात तर कोणी आपल्या रक्ताच्या नात्याला सोडुन एकटेच ग्रुपमध्ते रुम करुन तर कोणी पी.जी मध्ये राहुन मिळेन तिथे काम करुन आपला प्रपंच कसाबसा चालवत आसतो. सर्वांच्या जिवनात काही ना काही प्राॅब्लम आसतोच. दिवसभर काम करत आसताना पोटाची खळगी भरण्यासाठी कुठेतरी जेवणाची मेस लावायची किंवा मिळेन ते खाऊन दिवस काढायचे आसा दिनक्रम सर्वांचा ठरलेलाच आसतो.

परतु जे अन्न पोटाला खातो ते खरच स्वच्छ आणि केमिकल मिक्स केलेले नसते त्याचा काय भरोसा. ज्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत राहायचे त्याच पोटासाठी पैसे देऊन सुध्दा व्यवस्थित अन्न मिळत नसेनतर शरिर तरी काय साथ देणार मग पोटाचे मोठ मोठे विकार होऊन परत त्यात भर म्हणुन दवाखाना औषधे यांचा खर्च करत करत जिवन जगायचे.

मी भरपुर हाॅटेलमध्ये सर्वे केला तेथील कुक आचारी मालक यांना स्वच्छतेचा कोणताच आनुभव नसतो किचन मध्ये गहान साठलेली कामगार त्याच गहाण हाताने भाजी चिरत आसतात व चिरलेली भाजी न धुताच तशीच फोडणीसाठी टाकायची आशा आनेक गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. लोक पैसे देऊन हे अन्न खातात परंतु जे अन्न बनवले जाते ते पुर्ण असुरिक्षित आणि एकदम खालच्या दर्जाचे स्वस्त आसलेल्या वस्तुंचा वापर करुन खाऊ घातले जाते त्याचेच मला वाईट वाटते.

त्यासाठी मी विचार केला की आपण लोकांना चांगल्या दर्जाचे जेवण सुरु करावे ज्याने कडुन लोकांना घरच्यासारखे स्वच्छ आणि चांगले जेवण मिळेन ज्याने कडुन त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहुन त्यांना त्याचे जिवन सुखकारक पध्दतीने जगता यावे हेच माझे ध्येय आहे.

  हाॅटेल व्यावसाय तर सर्वच करतात परंतु तो व्यावसाय करताना हाॅटेल मालकाने स्वता कधीच मला परवडत नाही. कमी किमतीचे मसाले. किराणा मटरियल्स.भाजी इ. वस्तुचां कधीच वापर करायचा नाही हे पहिले ठरवले पाहिजे. स्वताला स्वच्छेतेचा किती आनुभव आहे हे स्वतालाच प्रश्न विचारुन त्यात सुधरणा केली पाहिजे. आचारी किती स्वच्छ पध्दतीने जेवण बनवतो त्याच्याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या प्लेट मध्ये जेवण दिले जाते किंवा चमचे वाटी दिल्या जातात त्याला चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसुनच त्यात जेवण दिले पाहिजे ह्या सर्व गोष्टींचे स्वता प्रक्षिशण घेणे गरजेचे आहे. उगीच पैसा आहे आणि कोणितरी बोलतो म्हणुन 10 / 12 कामगार जमा करुन हाॅटेल टाकायचे आणि लोकांच्या आरोग्याशी खेळत बसायचे हा व्यवसाय नसतो. हाॅटेल व्यावसाय हे सुध्दा एक आन्न दान आहे आणि आन्नदेवते बरोबर कधीच वाईट कृत्य करायचे नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचे.

काही पैसेवाले लोक पैसा आसतो म्हणुन हाॅटेल टाकतात त्या हाॅटेलची सोशल मिडिया वर व मोठ मोठे बॅनरबाजी करुन फार मोठी जाहिरात करतात आणि तिथे लाखो रुपये खर्च करतात मोठ मोठ्या आॅफर ठेवतात पण जेवणाची चव काहीच नसते. ते

मी सपुर्ण शहारातील लोकांना तर स्वच्छ आणि चंगल्या दर्जाचे जेवणतर देऊ शकत नाही परंतु हो जे माझ्याकडे माझ्यावर विश्वास ठेऊन जेवायला येतात त्या ग्रहाकांना मी नक्कीच चांगले आणि स्वच्छ जेवण देईन याचा मी माझ्या ग्रहाकांना पुर्ण विश्वास देते. कारण जशी मी माझ्या परिवारातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेते तसेच ग्रहाक सुध्दा माझ्या परिवारातील सदस्य आहेत त्यांना घरच्यासारखे चांगले आणि चविष्ट देणे हे माझे पहिले काम आहे आणि ग्रहाक जेंव्हा जेवण करुन संतुष्ट होतो आणि हासत मुखाने त्यांच्या तोंडुन जे व्हा....मस्त जेवण झाले फर दिवसातुन आसे घरच्या सारखे जेवण मिळाले आसे उध्गार निघतात तीच तर खरी माझी आर्धी कमाई आसते. पैसा जाताना कोणी संगती घेऊन जात नाही पण ह्या जगात आठवण नक्की ठेवली जाते. ईमानदारीचे फळ उशीरा मिळते पण मिळतेच हे नक्की. कारण आपला सर्व हिशोब त्याच्याकडे आसतो जसे कर्म तसे फळ मिळते म्हणुन माझा एकच उध्देश आहे की जो पर्यंत माझ्याकडे जेवणासाठी ग्राहाक येत राहतील तो पर्यंत मी त्यांना माझ्या परिचारातील सदस्य समजुन त्यांना चांगले जेवण देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेईन त्यात कोणतीच शंका नाही.

Our team

Our strength lies in our individuality. Set up by Esther Bryce, the team strives to bring in the best talent in various fields, from architecture to interior design and sales.

woman wearing black scoop-neck long-sleeved shirt
woman wearing black scoop-neck long-sleeved shirt
Esther Bryce

Founder / Interior designer

woman in black blazer with brown hair
woman in black blazer with brown hair
Lianne Wilson

Broker

man standing near white wall
man standing near white wall
Jaden Smith

Architect

woman smiling wearing denim jacket
woman smiling wearing denim jacket
Jessica Kim

Photographer